तक्रारवाडीत आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तक्रारवाडीत आढळला
अज्ञात पुरुषाचा मृतदेह
तक्रारवाडीत आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

तक्रारवाडीत आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

sakal_logo
By

भिगवण, ता. ९ : तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथील उजनी धरणाच्या पाण्याच्या फुगवट्यामध्ये छिन्नविच्छिन्न अवस्थेतील अज्ञाताचा मृतदेह आढळून आला. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न असल्याची बाब सकृतदर्शनी आहे. या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तक्रारवाडीचे पोलिस पाटील अमर सुरेंद्रकुमार धुमाळ यांनी भिगवण पोलिसांना खबर दिली. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, तक्रारवाडी येथे उजनी धरणाच्या पाण्याच्या फुगवट्यामध्ये ३० ते ३५ वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या मनगटाचे पाठीमागे टॅटू काढण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तींने मृत व्यक्तीचे डोके धारदार शस्त्राने वेगळे करून इतरत्र फेकून दिले आहे; तर शरीराच्या अवयव प्लास्टिक बॅगेमध्ये बांधून उजनी धरणाच्या पाण्याच्या फुगवट्यामध्ये फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाच्या वर्णनाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीबाबत कोणास माहिती मिळाल्यास तातडीने भिगवण पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन भिगवण पोलिसांनी केले आहे.