सौर ऊर्जेमुळे बचतीसह पर्यावरणाचे रक्षण

सौर ऊर्जेमुळे बचतीसह पर्यावरणाचे रक्षण

भिगवण, ता. २९ : ''सौर ऊर्जा हा तुलनेने कमी खर्चिक, पर्यावरणपूरक ऊर्जेचा प्रकार आहे. सौर उर्जेबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहे. सौर ऊर्जेचा वापर केल्यास आर्थिक बचतीसह पर्यावरणाचेही संरक्षण होण्यास मदत होईल. महाविद्यालयीन युवकांनी सौर ऊर्जेचे महत्त्व समजून घेऊन ते लोकांनाही पटवून द्यावे,'' असे आवाहन महाराष्ट्र विद्युत मंडळाचे शाखा अभियंता राजेश भगत यांनी केले.
येथील कला महाविद्यालयांमध्ये ''अधिकारी आपल्या भेटीला'' उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र विद्युत मंडळाचे शाखा अभियंता राजेश भगत यांचे ''सौर उर्जा काळाची गरज'' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते.
भगत पुढे म्हणाले, सध्या सौर ऊर्जेच्या बाबत मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे तसेच शासकीय पातळीवरुनही सौर ऊर्जेच्या वापरासाठी लोकांना प्रोत्साहित केले जात आहे त्याचा परिणाम म्हणून त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे ही समाधानाची बाब आहे. यावेळी महेश पवार यांनी सौर ऊर्जेच्या बाबतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
प्रा. धनाजी मत्रे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. अविनाश सूर्यवंशी यांनी आभार केले. कार्यक्रमासाठी प्रा. किरण गुणवरे, प्रा. रणजित इनामके, प्रा. नानासाहेब आवारे,प्रा. निलेश जाधव,प्रा. समीर बळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, भिगवण मंडलमध्ये सौर ऊर्जेचा पहिला प्रयोग येथील कला महाविद्यालयाने केला आहे. पाच वर्षापूर्वी महाविद्यालयांने सौर ऊर्जेचा प्रकल्प कार्यान्वित करत या भागातील लोकांना दिशा देण्याचे काम केले आहे.

दरम्यान, भिगवण मंडलमध्ये सौर ऊर्जेचा पहिला प्रयोग येथील कला महाविद्यालयाने केला आहे. पाच वर्षापूर्वी महाविद्यालयाने सौर ऊर्जेचा प्रकल्प कार्यान्वित करत या भागातील लोकांना दिशा देण्याचे काम केले आहे.

प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, अकलूज (जि. सोलापूर) येथील महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अभियंता महेश पवार, डॉ. प्रशांत चवरे, प्रा. बाळासाहेब खरात, प्रा. धनाजी मत्
रे, निखील हिंगसे, सागर वाघमोडे, बापू बंडगर, राजू बागूल उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com