मदनवाडीत हॉटेलवर पोलिसांचा छापा

मदनवाडीत हॉटेलवर पोलिसांचा छापा

भिगवण, ता. १० : मदनवाडी (ता. इंदापूर) येथील हॉटेलवर छापा टाकून येथे अवैद्य वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करत पोलिसांनी कारवाई केली.

या प्रकरणी नामदेव बाळासो बंडगर, अमित तानाजी भोकरे(रा. दोघे मदनवाडी, ता.इंदापूर), रोहित अंकुश निकम(रा. उद्धट, ता.इंदापूर), गजानन लक्ष्मण ठाकूर, मुंगाजी ऊर्फ पिंटू आवरगड(रा. दोघे रुमळा, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांचेविरुध्द येथील भिगवण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन आरोपींना अटक केली आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक संजय जाधव, बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली परिवेक्षाधीन सहाय्यक पोलिस अधिक्षक दर्शन दुगड, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश बावकर, पोलिस उपनिरीक्षक रूपेश कदम, युवराज घोडके, पोलिस अंमलदार दत्तु जाधव, रणजित मुळीक, अंकुश माने, अप्पा दराडे नारायण वाळके, डी.एल. इंगोले, डी.एस. जाधव, सारिका जाधव यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com