दत्तकला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन प्राध्यापकांना पीएच. डी प्रदान

दत्तकला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन प्राध्यापकांना पीएच. डी प्रदान

भिगवण. ता, २ : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रा. भाऊसाहेब अनारसे यांना सनराईज विद्यापीठ अलवार व प्रा. कमलकिशोर शर्मा यांना जे. जे. टी. विद्यापीठ राजस्थान या विद्यापीठांकडून अभियांत्रिकी शाखांतील पीएच. डी पदवी नुकतीच प्रदान केली. ग्रामीण भागातील महाविद्यालयातील प्राध्यापकांनी संशोधन क्षेत्रामध्ये मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रा. अनारसे यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये ‘‘क्रिटिकल स्टडी ऑफ होल्टेज मॅनेजमेंट वर्क युजिंग ऑप्टिमाइज्ड इलेक्ट्रिकल पावरफ्लो इन्वेस्टीगेशन’’ या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. या विषयावर त्यांचे दोन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. पीच. डी संशोधनासाठी प्रा. अनारसे यांना डॉ. राम मोहन सिंग भदोरिया यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. कमलकिशोर शर्मा यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ‘संरचना आरोग्य सुधारण्यासाठी मल्टीवॉल कार्बन नॅनो ट्यूबची अंमलबजावणी’ या विषयावर शोध निबंध सादर केला होता. प्रा. शर्मा यांना डॉ. शिवकुमार राममूर्ती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. अनारसे व प्रा. शर्मा यांनी पीच. डी पदवी प्रात्प केल्याबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी, सचिव माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, महाविद्यालयाचे संचालक डॉ. शरद कर्णे, प्राचार्य डॉ. अप्पासो केस्ते, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत साळुंके उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी व सचिव माया झोळ यांचे हस्ते प्रा. अनारसे व प्रा. शर्मा यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना प्रा. रामदास झोळ म्हणाले, ‘‘दत्तकला शिक्षण संस्थेतील प्राध्यापकांनी अभियांत्रिकी क्षेत्रात केलेल्या संशोधनाचा देशातील पायाभूत सुविधांच्या विकास करण्यासाठी तसेच येणाऱ्या अभियंत्यांना याचा फायदा होऊ शकतो. संशोधन केलेल्या प्राध्यापकांचा आदर्श घेऊन इतरांनी यावे.’’
यावेळी प्रा. अनारसे व प्रा. शर्मा यांनी संशोधनासाठी दत्तकला शिक्षण संस्थेने केलेल्या सहकार्याबद्दल संस्थेचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com