रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या अध्यक्षपदी संतोष सवाणे

रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या अध्यक्षपदी संतोष सवाणे

Published on

भिगवण, ता. १० : येथील रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या अध्यक्षपदी संतोष सवाणे यांची तर सचिवपदी संजय रायसोनी यांची निवड करण्यात आली आहे. नुकताच सवाणे, रायसोनी व इतर पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ रोटरी क्लबच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
येथील तारादेवी लॉन्स येथे रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आयोजित केला होता. पदग्रहण समारंभासाठी रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल रवी धोत्रे व सहाय्यक प्रांतपाल दत्तात्रेय बोराटे, रोटरी क्लब ऑफ भिगवणचे माजी अध्यक्ष रणजित भोंगळे, सचिव प्रदीप ताटे, रोटरी क्लब ऑफ भिगवणचे संस्थापक-अध्यक्ष सचिन बोगावत, रोटरीचे जिल्हा संचालक प्रफुल्ल भंडारी, नरेंद्र गांधी, रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अरविंद गरगटे, माजी प्रा. अजय दरेकर, सरपंच दिपिका क्षीरसागर, आशुतोष मिश्रा तसेच परिसरातील रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल रवी धोत्रे म्हणाले की, तळागाळातील लोकांना मदत करणे हा रोटरी क्लबचा प्रमुख उद्देश आहे. दरम्यान रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष सवाणे व सचिव रायसोनी यांच्याकडे माजी अध्यक्ष रणजित भोंगळे व माजी सचिव प्रदीप ताटे यांनी पदभार सुपूर्द केला. रोटरी क्लब ऑफ भिगवणची नूतन कार्यकारिणी निवडली.

नूतन कार्यकारिणी : उपाध्यक्ष निखिल बोगावत, खजिनदार कुलदीपक ननवरे, संचालक रणजित भोंगळे, रियाज शेख, महेश शेंडगे, संपत बंडगर, संजय चौधरी, संजय खाडे, प्रवीण वाघ, डॉ. अमोल खानावरे, तुषार क्षीरसागर, कमलेश गांधी, धर्मेंद्र गांधी, नामदेव कुदळे, अतुल वाघ, अभिजित आटोळे, प्रदीप वाकसे, प्रदीप ताटे, बाळासाहेब सोनवणे, सपना दोशी, अफजल सय्यद, किरण रायसोनी, दीपाली भोंगळे, औदुंबर हुलगे, थॉमस मथाई, सुषमा वाघ, डॉ. प्राची थोरात, वैशाली बोगावत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.