

भिगवण, ता. २२ : सध्या ग्रामीण भागांमध्येही डिजिटल, ऑनलाइन व्यवहार वाढले आहेत; परंतु वाढत्या व्यवहारांबरोबरच फसवणुकीचेही अनेक प्रकार समोर येत आहेत. येथील एका व्यावसायिकाची डिजिटल व्यवहारातून सुमारे एक लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार केली आहे.
सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे विविध कंपन्यांकडून ऑनलाइन व्यवहारांवर वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत, तसेच त्यावर जाहीर करण्यात आलेले बोनस मिळविण्याकरिता देण्यात आलेली लिंक भरण्यास सांगण्यात येत आहे. या लिंकवर खातेदारांना त्यांच्या खात्याची माहिती भरण्यास सांगण्यात येते. खात्याची माहिती भरताच खाते साफ झाल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.
भिगवण येथील व्यावसायिक अफजल सय्यद यांनी त्यांची एक लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सायबर गुन्हे शाखेमध्ये दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की अफजल सय्यद यांचे आरबीएल बॅंकेमध्ये खाते होते. ‘तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले बोनस मिळविण्याकरिता दिलेल्या लिंकवर आजच माहिती भरा’ असा संदेश त्यांच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झाला होता. त्यानंतर अफजल सय्यद यांनी लिंकवर माहिती भरताच त्यांच्या खात्यामध्ये असलेले एक लाख ६८ हजार रुपये कुणीतरी लगेच काढून घेतले. त्यानंतर अफजल सय्यद यांनी बॅंकेशी संपर्क साधला असता, त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत अफजल सय्यद यांनी सायबर शाखेत तक्रार दाखल केली असून, सायबर शाखेकडून तपास करण्यात येत आहे.
अफजल सय्यद म्हणाले, बॅंकेच्या खात्यांमध्ये ठराविक व्यवहार केल्यानंतर बोनस जमा होतात. त्यामुळे या बोनससाठी बॅंकेकडून लिंक पाठविली, असा समज करून लिंक भरली. परंतु माहिती भरताच खात्यावरील एक लाख ६८ हजार रुपये अज्ञाताने काढून घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.