कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या गाईंची सुटकाः वाहन चालकांविरुध्द गुन्हा दाखल

कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या गाईंची सुटकाः वाहन चालकांविरुध्द गुन्हा दाखल
Published on

भिगवण, ता. ३ : डिकसळ (ता. इंदापूर) येथून कत्तलीसाठी अवैधरीत्या घेऊन जात असलेल्या दोन गायींची पोलिस प्रशासनाने सुटका केली आहे. याप्रकरणी गायींची वाहतूक करणाऱ्या चालकाविरुद्ध येथील भिगवण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी लहू दत्तात्रेय जगताप (वय ४९, रा. खडकी, ता. दौंड) याच्याविरुद्ध येथील भिगवण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डिकसळ (ता. इंदापूर) येथून मंगळवारी (ता. ३) सकाळी सहाच्या सुमारास गाडीतून चालक लहू दत्तात्रेय जगताप हा गोवंशाच्या वाहतुकीला परवानगी नसताना अवैधरीत्या दोन गायी त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता कत्तल करण्यासाठी राशीन (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून गाडी व दोन गायी अंदाजे किंमत दोन लाख २० हजार रुपये, असा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com