

भिगवण, ता. ११ : येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेच्या आयोजनासाठी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेमध्ये मोठा गोंधळ झाला. गोंधळामध्ये काही ज्येष्ठ नागरिकांची बाचाबाची झाली.
भिगवण (ता. इंदापूर) येथील भैरवनाथ यात्रा समितीवर मागील काही वर्षांपासून प्रशासकांची नेमणूक केली आहे. चालु वर्षीच्या श्री भैरवनाथ महाराज यात्रा समितीच्या आयोजनाबाबत तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली भिगवण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेसाठी धर्मादाय विभागाच्या प्रतिनिधी प्रज्ञा कांबळे, भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय परदेशी, सरपंच गुराप्पा पवार, उपसरपंच सत्यवान भोसले, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गतवेळी येथील यात्रेसाठी राबविण्यात आलेली कार्यपद्धती यावेळीही राबविण्यात यावी, अशी सूचना यावेळी मांडण्यात आली, तर सामाजिक कार्यकर्ते रमेश धवडे यांनी श्री भैरवनाथ यात्रा सोहळ्यातील वर्गणीपैकी काही रक्कम ही सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्याची सूचना मांडली. त्यास काही नागरिकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ग्रामसभेमध्ये गोंधळास सुरवात झाली. थोड्याच वेळात गोंधळाचे रूपांतर बाचाबाची झाले. त्याचा फटका काही ज्येष्ठ नागरिकांनाही बसला.
परिस्थितीचे गांभीर्य विचारात घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी सूत्रे हाती घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. याबाबत येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महागंडे म्हणाले, ‘‘ग्रामसभेमध्ये काही मुद्द्यांबाबत मतभेद निर्माण झाल्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. परंतु, पोलिसांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.’’
नागरिकांमध्ये संभ्रमावस्था
श्री भैरनवाथ महाराज यात्रेसाठी आयोजित ग्रामसभेमध्ये गोंधळ झाल्यामुळे चालु वर्षीची भैरवनाथ यात्रा कशा पद्धतीने पार पडणार, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. यात्रा आठवड्यावर येऊन ठेपली असताना ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासकीय पातळीवरील गोंधळामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.