भिगवण कडकडीत बंद; छावणीचे स्वरूप
भिगवण, ता. १८ : येथील २१ वर्षीय तरुणीच्या अपहरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ''भिगवण बंद''ला बुधवारी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार कडकडीत बंद राहिल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. दरम्यान, तणावपूर्ण परिस्थितीमुळे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून भिगवणला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शासकीय विश्रामगृहाजवळून मंगळवारी (ता. १७) दुपारी चारच्या सुमारास आई आणि भावासोबत जात असलेल्या तरुणीचे दोन आरोपींनी अपहरण केले होते. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी भिगवणला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. पुणे आणि अहिल्यादेवीनगर परिसरात आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून, नागरिकांनी तपासात सहकार्य करावे, असे आवाहन गिल यांनी केले आहे.
घटनेला २४ तास उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने मदनवाडी आणि स्वामी चिंचोली (ता. दौंड) परिसरात तणाव आहे. दरम्यान, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
1381
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

