सोलापूर महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू

सोलापूर महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू

Published on

भिगवण/पळसदेव, ता. २६ : पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज क्र. २ (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत रस्त्यालगत नादुरुस्त अवस्थेत उभा असलेल्या मालवाहतूक टेम्पोला मोटार पाठीमागून धडकली. त्याचवेळी वेगाने आलेल्या ट्रकनेही मोटारीला धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघात मोटारचालकाची मुलगी, आई, नातवाचा मृत्यू झाला. तर मोटारचालकासह त्याची पत्नी, मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.
आदिती अमर हातेकर (वय २५), जय अमर हातेकर (वय २) सखूबाई ईश्वर गेजगे (वय ६० रा. सर्व सांगोला, सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची तर मोटारचालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय ५०), स्वाती कबीरदास गेजगे (वय ३४), समृद्धी कबीरदास गेजगे (वय १० महिने सर्व रा. सर्व पाटस, ता. दौंड) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटस येथील कबीरदास गेजगे व त्यांचे कुटुंब हे त्यांचा नातू जय अमर हातेकरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सांगोला येथे गेले होते. वाढदिवस साजरा करून परतत होते. पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज क्र. २ गावच्या हद्दीतील ओढ्यावरील पुलावर टायर फुटल्यामुळे रस्त्यालगत बुधवार (ता. २५) पासून टेम्पो (क्र. एमएच १३ सीयू ५१६३) धोकादायक स्थितीत उभा होता. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्याच्या दिशेने निघालेल्या मोटारी (क्र. एम.एच.१२ एक्स.ई. ८८१६)ची उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून धडक बसली. या दरम्यान मोटारीच्या पाठीमागून आलेल्या एका अज्ञात ट्रकने मोटारीला धडक दिली. टेम्पो व ट्रकच्या दुहेरी धडकेत सापडलेल्या मोटारीतील तिघांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्ग, भिगवण पोलिस व महामार्ग पोलिस बलाचे जवान आणि लगतच्या शेतात काम करणारे शेतकरी मदतीसाठी धावले. मोटारीतील अपघातग्रस्तांना तातडीने भिगवण येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. रस्त्याने जाणाऱ्या एका छोट्या क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त मोटार बाजूला घेण्यात आली. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास भिगवणचे साहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

3450

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com