भोरमध्ये मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरमध्ये मिरवणूक
भोरमध्ये मिरवणूक

भोरमध्ये मिरवणूक

sakal_logo
By

भोर, ता. १२ : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. शहरातील राजगड ज्ञानपीठाचे जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, जिजामाता प्रायमरी स्कूल आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी विद्यालय व गर्ल्स हायस्कूलमधील सुमारे दीड हजार विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले. जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले. जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रुबिना शेख, प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका मनीषा मोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाघ आणि गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. राजवाडा चौक, मंगळवार पेठ, चौपाटी या परिसरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे, गौरी पवार, नगरसेवक गणेश पवार, सुनील पवार, सुहास देशमाने, गणेश बुदगुडे उपस्थित होते.