
सुजाता भालेराव यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार
भोर, ता. २० : नेरे (ता. भोर) येथील पंचक्रोशी आदर्श विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुजाता रवींद्र भालेराव यांना ''माता रमाई आंबेडकर'' हा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्यावतीने पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याहस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बार्टी आणि स्वयंदीप सोशल फाउंडेशन यांच्यावतीने माता रमाई यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त घेतलेल्या महिला संविधान परिषदेत या पुरस्कारांचे वितरण केले.
यावेळी डॉ़. विद्या राईकवार, अॅड. मनिषा महाजन, हर्षदा कांबळे, हेमलता बेडेकर, रत्नप्रभा ताकतोडे आदी उपस्थित होते. सुजाता भालेराव यांच्यासह कमल कांबळे व विशाखा धम्मचारिणी यांनाही पुरस्कार दिला.