गळती दूर करण्यास मुहूर्त कधी?

गळती दूर करण्यास मुहूर्त कधी?

भोर, ता. २७ : गेल्या दीड महिन्यापासून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या वितरण लाइनच्या पाइपमधून गळती होत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासनाकडून पाणीगळती दूर करण्याच्या कामास मुहूर्त मिळत नाही. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
शहरातील चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सुरू असलेल्या पाणीगळतीमुळे अपघाताचा धोका सांभावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. तरीदेखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. दररोज पहाटे साडेसहा वाजता पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पाणीगळती सुरू होते. शहरातील सर्व रस्ते हे सिमेंट क्रॉक्रीटचे झाल्यामुळे पाणी वेगाने वाहते. रस्त्यावरील पाण्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना रस्ते साफ करता येत नाहीत. याशिवाय दुचाकी घसरल्यामुळे छोटे अपघातही होत आहेत. या पाणीगळतीमुळे शहरातील चौपाटी, श्रीपतीनगर, वेताळ पेठ, मंगळवार पेठ या भागांमध्ये पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होत आहे. छत्रपतींच्या पुतळ्याजवळील पाणीगळती होत असलेला रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येतो. नगरपालिका प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क केला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने यास हिरवा कंदील दिला आहे. तरीदेखील नगरपालिका प्रशासनाकडून पाणीगळती काढण्याचे काम सुरु केले नाही. पावसाळा सुरु झाल्यावर बाहेरचे घाण पाणी पाइपलाइनमध्ये जाऊन सर्व पाणी पिण्यास योग्य राहणार नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे थांबवावे आणि पाणीगळतीचे काम त्वरित करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
01741

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com