भोर तालुक्यात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

भोर तालुक्यात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Published on

भोर, ता. १६ : तालुक्यातील जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.
आरक्षणासाठी सदर ग्रामपंचायतीमध्ये २१ जूनला विशेष ग्रामसभा घेण्यात येणार असून त्यासाठी शुक्रवारी (ता. १६) विशेष ग्रामसभेची सूचना दिली. विशेष ग्रामसभा बोलावून, तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या‌ अध्यक्षतेखाली, आरक्षणाची सोडत काढली (अनु. जाती महिला, अनु. जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) जाणार आहे. सोडतीनंतर २२ जूनला प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २३ ते ३० जून दरम्यान प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करणार आहेत. ६ जुलैला उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय देतील. १२ जुलै ला उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) जिल्हाधिकारी यांच्याकडून मान्यता देण्यात येणार आहे. १४ जुलैला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला (नमुना अ) प्रसिद्धी दिली जाणार आहे. असा ग्रामपंचायत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आहे.

निवडणूक जाहीर झालेल्या २७ ग्रामपंचायती
शिळिंब, आशिंपी, वारखंड, शिरगाव, पऱ्हर खु., पऱ्हर बु., दापकेघर, रायरी, साळव, शिरवली हिमा, कोंढरी, हिर्डोशी, टिटेघर, वडतुंबी, नांदगाव, आंबवडे, वरोडी डायमुख, वरोडी बु., पळसोशी, वरोडी खु., नांटबी, करंजे, महुडे खु., जयतपाड, कुरुंजी, कांबरे बु., माळेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com