फार्मसी कॉलेजमध्ये शैक्षणिक धोरण सप्ताह

फार्मसी कॉलेजमध्ये शैक्षणिक धोरण सप्ताह

भोर, ता. २१ : राजगड ज्ञानपीठाच्या कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये शैक्षणिक धोरण २०२० सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये नवीन शैक्षणीक धोरणातील बदल, पोस्टर प्रदर्शन, सेमिनार, चर्चासत्र, प्रश्नमंजूषा, औषधनिर्माण क्षेत्रातील करिअर संधी व आव्हाने, रॅगिंग प्रतिबंधात्मक कारवाई आदी प्रमुख कार्यक्रमांचा समावेश आहे. राजगड ज्ञानपीठचे कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे, सचिव स्वरूपा थोपटे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन केले होते. या वेळी डॉ. प्रसन्न दातार, प्रा. काकासाहेब कोरे, प्रा. संभाजी बुधावले, सचिन खोपडे, डॉ. राहुल सोनवणे, प्रा. डॉ. विशाल कांबळे व प्रा. वैभवी कुंजीर आदींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. फार्मसी महाविद्यालयातील श्रीकांत बोराटे, विशाल भगत, डॉ. दीपक कर्डिले, प्रवीण आवटे, तुषार शिंदे, मयूर कर्णे, माधुरी केसकर, कोमल यादव, व्योमकेश्वरी गायकवाड आदी प्राध्यापकांनी या सप्ताहाचे नियोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com