मांढरदेवीचे मंदिर गुरुवारपर्यंत बंद

मांढरदेवीचे मंदिर गुरुवारपर्यंत बंद

भोर, ता. ६ : मांढरदेव (ता. वाई, जि. सातारा) येथील श्री काळुबाई देवीचे (मांढरदेवीचे) मंदिर रविवार (ता .७) ते गुरुवार (ता . ११) या पाच दिवसांकरिता बंद ठेवले आहे, अशी मांढरदेव देवस्थान ट्रस्टतर्फे देण्यात आली. मांढरदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. याचा त्रास भाविकांना होऊ नये, तसेच कामामुळे अपघाताचा धोका होऊ नये यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून ११ जानेवारीपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. देवीचे मंदिर हे शुक्रवारी (ता. १२) तारखेपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. दरम्यान, कापूरहोळ- भोर ते मांढरदेवी या मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे मांढरदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अधिक वेळ लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com