वीर धरण प्रकल्पग्रस्तांसाठी
चार कोटी रुपये निधी मंजूर

वीर धरण प्रकल्पग्रस्तांसाठी चार कोटी रुपये निधी मंजूर

भोर, ता. १० : वीर धरण प्रकल्पग्रस्तांच्या भोर तालुक्यातील १० पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी चार कोटी रुपयांच्या खर्चाच्या निधीस प्रशासकीय शासनाकडून मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाकडून गुरुवारी (ता. ७) याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार ३ कोटी ८५ लाख १९ हजार रुपयांचा निधी वितरित केली जाणार आहे.
धरणाच्या निर्मितीपासून प्रकल्पग्रस्त गावांना सोयीसुविधा दिल्या नव्हत्या. आमदार संग्राम थोपटे यांनी या वीर धरण प्रकल्पग्रस्त गावांना निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. वीर प्रकल्पग्रस्त भांबवडे, पांडे, सारोळा, सावरदरे, टापरेवाडी, पेंजळवाडी, केंजळ, काळेवाडी, धांगवडी व आळंदे आदी गावठाणांचा समावेश आहे. या गावांमधून रस्ते, गटारे, कॉंक्रीटीकरण, समाजमंदिर आदी विकासकामे करण्यात येणार आहेत.
शासन निर्णयानुसार गावठाणांसाठी वितरित करण्यात येणारा निधी व कंसात रक्कम लाखात पुढीलप्रमाणे- भांबवडे -अंतर्गत रस्ता व कॉंक्रीटीकरण करणे (४० लाख ८५ हजार), पांडे-रामोशीवस्ती ते गावठाण डांबरीकरण करणे (३८ लाख), सावरदरे- रस्ता डांबरीकरण (१४ लाख २५ हजार), सारोळे- रस्ता कॉंक्रीटीकरण (४६ लाख ८० हजार), टापरेवाडी- अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण (३३ लाख १५ हजार), टापरेवाडी- आरसीसी गटर बांधणे (३३ लाख १५ हजार), पेंजळवाडी- अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण (२७ लाख), काळेवाडी- गावठाण पोहोच रस्ता (२३ लाख ७५ हजार), केंजळ- केंजळ ते धांगवडी पोहोच रस्ता (७६ लाख), धांगवडी- स्मशानभूमी रस्ता व आरसीसी गटर करणे (३५ लाख ५५ हजार) आणि आळंदे- समाजमंदिर बांधणे (३८ लाख).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com