ऐन उन्हाळ्यात नीरा नदी वाहतेय दुथडी भरून

ऐन उन्हाळ्यात नीरा नदी वाहतेय दुथडी भरून

भोर, ता. २९ : भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणातून २ हजार ३०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नीरा नदीमधून पाणी पूर्व भागाला जात असल्यामुळे भर उन्हाळ्यातही नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. नीरा नदीमधील पाण्याचा खळखळ आवाज ऐकून नागरिकांच्या मनात हर्ष दाटून आला आहे. पाण्याचा प्रवाह पाहून नागरिकांच्या मनात हा उन्हाळा आहे की पावसाळा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नीरा नदीमधून पाणी वाहत असल्यामुळे पूर्वेकडील भागातील नागरिक आनंद व्यक्त करीत आहेत. मात्र धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे भोर तालुक्यातील नागरिकांची मात्र चिंता वाढत आहे. कारण धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता आहे. नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील काही गावांचा पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत तर भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे.

भाटघर धरणात सध्या १०.७० टक्के म्हणजे २.५ टीएमसी पाणीसाठा आहे. तर ११.९४ टीएमसी क्षमता असलेल्या नीरा-देवघर धरणात १४.९१ म्हणजेच १.७३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. दोन्हीही धरणांवरील वीजनिर्मिती केंद्र बंद आहेत. मात्र केवळ नीरा देवघर धरणातून दोन हजार ३०० क्यूसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत आहेत. वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ३०० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. गुंजवणी धरणात २७ टक्के पाणीसाठा आहे. नीरा खोऱ्यातील धरण साखळीतील वीर धरणातील पाण्याची पातळी राखण्यासाठी नीरा-देवघर धरणातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे वीर धरणात दररोज २ हजार ६०० क्यूसेक्स पाणी जमा होत आहे. वीर धरणाच्या उजव्या कालव्यातून १ हजार ५५० क्यूसेक्सने तर डाव्या कालव्यात ८२७ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे.

...तो पर्यंत सोडण्यात येणार पाणी
नीरा-देवघर प्रकल्पग्रस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे शासनाने नीरा देवघर धरणाच्या दोन्ही बाजूला २०० मीटर परिसरात कलम १४४ लागू केलेले आहे. यामुळे नीरादेवघर धरणातील १.५ टीएमसी हा राखीव पाणीसाठा होईपर्यंत पाणी पूर्वेकडे सोडण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.


धरणातील सोमवारी (ता.२९) सकाळी असलेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे
धरण ........ क्षमता (टीएमसी) ........पाणीसाठा (टीएमसी)........टक्केवारी
भाटघर........२३.७४ ........२.५ टीएमसी........१०.७०
नीरा देवघर........११.९४ टीएमसी........१.७३ टीएमसी........१४.९१
गुंजवणी........३.६९ टीएमसी........०.९ टीएमसी........२७.०७
वीर........९.४ टीएमसी........३.४ टीएमसी........३६.२४


03489

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com