सुळे यांच्या विजयानंतर भोरमध्ये कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंदोत्सव

सुळे यांच्या विजयानंतर भोरमध्ये कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आनंदोत्सव

भोर, ता. ४ : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे या एक लाखांपेक्षा मताधिक्याने निवडून आल्या. त्यांच्या निवडीबद्दल भोरमधील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यालयासमोर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या घोषणा दिल्या. सुप्रिया सुळे यांच्या विजयात भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड (वेल्हे) व मुळशी तालुक्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. मतदारसंघातील तीनही तालुक्यांत प्रचाराची जबाबदारी सांभाळून सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमदार संग्राम थोपटे यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.
विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कॉंग्रेसचे अभिषेक येलगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, माजी नगरसेवक जगदीश किरवे, तौसीफ आतार, अमित दरेकर, संजय खामकर, प्रमोद थोपटे, शांताराम पवार, नथू खोपडे, रोहित शिंदे, संदीप टोळे, आबा मळेकर, मोहन चव्हाण आदींनी पुढाकार घेतला. आमदार थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना मनापासून साथ दिली. असे कॉंग्रेसचे कार्यकर्ते अभिषेक येलगुडे व तौसीब आतार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com