आमदार थोपटे यांच्याकडून राजकीय स्टंटबाजी

आमदार थोपटे यांच्याकडून राजकीय स्टंटबाजी

भोर, ता. ६ : निवडणुकीच्या काळात आचारसंहिताभंगाच्या गुन्ह्याच्या कारणामुळे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा देणे, ही आमदार संग्राम थोपटे यांची आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची राजकीय स्टंटबाजी आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राजकीय स्वार्थासाठी पोलिसांवर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. आमदार थोपटे यांनी भोर शहरातील घटत चाललेल्या लोकसंख्येबाबत विचार करावा आणि शहरातील अवैध धंद्यांविरोधात आंदोलने करावी, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी केली.
भोर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयात महायुतीच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार संग्राम थोपटे यांनी बुधवारी (ता. ५) आचारसंहितेच्या काळात पैसे वाटणाऱ्यांवरील कारवाईस विलंब करीत असल्याबद्दल पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यास महायुतीच्या वतीने गुरुवारी (ता. ६) पत्रकार परिषद घेऊन उत्तर देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक यशवंत डाळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदार देशपांडे, शिवसेनेचे नितीन सोनावले, भाजपचे अॅड कपिल दुसंगे, अतुल काकडे, कुणाल धुमाळ, सोमनाथ ढवळे, विजय मळेकर, प्रशांत पवार व बाळासाहेब खुटवड आदी उपस्थित होते.
शिवतरे म्हणाले, ‘‘आचारसंहितेचा भंग असेल तर कारवाई करायला हवी, परंतु कायदा हातात घेऊन गाड्या फोडून दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मतदानासाठी मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण तयार कोणी केले? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दुकानातून ओढून कोणी मारले? आपल्याच संस्थेतील लोकांना सांगून पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. यासंदर्भात उच्चस्तरीय पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने पोलिस अधीक्षकांना २७ मे रोजीच केलेली आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचे काम आमदार थोपटे करीत आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com