आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीवर भर द्या

आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीवर भर द्या

Published on

भोर, ता. २ : ‘‘शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकांची लागवड करावी. सेंद्रिय पद्धतीमुळे लोकांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. यासाठी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा,’’ असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी अशोक पवार यांनी केले.

राज्य शासन, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने सोमवारी (ता.१) कृषी दिनानिमित्त येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विषमुक्त सेंद्रिय शेती, बांबूशेती, शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजना आदींची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात सेंद्रिय शेती करणारे शेतकरी गुलाब घुले आणि एसआरटी तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते शेतकरी किरण यादव यांनी अनुभव सांगून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, कार्यक्रमानंतर वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी जिल्हा कृषी अधिकारी संदीप पवार, भोरचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, तालुका कृषी अधिकारी संजीवन गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी भाऊसाहेब बोरकर, कृषी विभागाचे चंद्रकांत विपट आदींसह शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजते शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी एस ए. कारंडे, कृषी विस्तार अधिकारी विजय कोळी, शिवराज पाटील, राज्य शासनाच्या कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी, आत्माचे लक्ष्मीकांत कणसे आदींनी विशेष प्रयत्न केले. दीपाली चांदगुडे यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल दानवले यांनी सूत्रसंचालन केले.

03773

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.