आंबवडे येथील
तरुणाची आत्महत्या

आंबवडे येथील तरुणाची आत्महत्या

Published on

भोर, ता. १० : आंबवडे- घोरपडेवाडी (ता. भोर) येथे तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी (ता. ९) सकाळी लक्षात आले. प्रवीण नामदेव घोरपडे (वय ३१), असे त्याचे नाव आहे.
याबाबत नवनाथ आनंद घोरपडे (४५, रा. आंबवडे) यांनी भोर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार त्यांचा चुलत भाऊ प्रवीण याने राहत्या घरामध्ये लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेतला. कुटुंबातील सदस्यांनी नवनाथ यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भोर येथे दाखल केले. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पोलिसांनी आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीप्ती करपे पुढील तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.