‘माझी शाळा सुंदर शाळा’च्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल जाहीर

‘माझी शाळा सुंदर शाळा’च्या 
दुसऱ्या टप्प्याचा निकाल जाहीर
Published on

भोर, ता. १५ : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचे तालुका पातळीवरील दुसऱ्या टप्प्याचे मूल्यांकन झाल्यानंतर शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. या दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील जिल्हा परिषद गटामध्ये प्राथमिक शाळा देगाव आणि खासगी शाळा गटात काशिनाथराव खुटवड माध्यमिक विद्यालय हातवे यांना प्रथम क्रमांक मिळाला. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्रौली आणि राजा रघुनाथराव विद्यालय या दोन्ही शाळांचा प्रथम क्रमांक आला होता. दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या गुणांकामध्ये वाढ झाल्याने या दोन्ही शाळांची जिल्हा पातळीवर निवड झाली आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १००, तर दुसऱ्या टप्प्यात १५० पैकी गुण देण्यात आले आहेत.
तालुका पातळीवरील दुसऱ्या टप्याच्या मुल्यांकनात जिल्हा परिषद गटात नांदगाव आणि केंजळ प्राथमिक शाळेने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. तर खासगी शाळा गटात श्री छत्रपती शिवाजी विद्यालय भोर आणि विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल भोलावडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. दुसऱ्या टप्प्यात प्रथम तीन क्रमांकांच्या शाळांना अनुक्रमे ३ लाख, २ लाख आणि १ लाखाचे बक्षीस देण्यात येणार आह, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे व अभियानाच्या सचिव प्रभावती कोठावळे यांनी दिली.

जिल्हास्तरावर पात्र शाळांना दोन्ही टप्प्यात मिळालेले गुण
प्राथमिक शाळा उत्रौली - (९७, १४२), प्राथमिक शाळा देगाव - (९५, १४२), राजा रघुनाथराव विद्यालय भोर - (९७, १४५) व काशिनाथराव खुटवड विद्यालय हातवे (९०, १३९).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com