भोर- वेनवडी मार्गावर पावसाने वाहतूक ठप्प
भोर, ता. ९ : पंढरपूर- भोर- महाड राष्ट्रीय मार्गाच्या शिंदेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) ते वरंधा घाटादरम्यानच्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याचा ६० टक्के भाग खोदून ठेवला आहे. त्यात बुधवारी (ता. ९) पाऊस पडल्यामुळे खोदलेल्या रस्त्यात वाहने अडकून पडली. त्यामुळे भोरहून महाडला जाणारी आणि येणारी वाहतूक भोर ते वेनवडी गावच्या दरम्यान ठप्प झाली. बुधवारी दुपारपासून भोर शहर आणि वेनवडी गावच्या दरम्यान असलेल्या मांगीरीच्या ओढ्याजवळ वाहने चिखलात खचण्यास सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता दोन मोठी वाहने खचून चिखलात अडकून पडली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी वाहतूक कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चिखलात अडकलेली वाहने बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे आणि रस्त्याचा बराचसा भाग हा खोदलेला असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. पोलिसांनी महाड बाजूकडून येणारी वाहने पिसावरे-नांद मार्गे भोरला वळवली. परंतु, तो रस्ताही कच्चा असल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे त्या मार्गावरही वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे अनेक वाहने दोन तास अडकून पडली आहेत. वाहतूक पोलिस सुनील चव्हाण यांच्यासह पाच पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करीत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

