भोर मतदारसंघात ५६४ केंद्रांवर ३ हजार ७२२ कर्मचारी
भोर, ता. १९ : विधानसभेच्या मतदानाची तयारी पूर्ण झाली असून २०३ भोर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर मंगळवारी (ता.१९) चार वाजता मतदान साहित्य आणि कर्मचारी पोहोचले.
मतदारसंघातील भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यांतील एकूण ५६४ मतदान केंद्रांवर साहित्य पाठविण्यासाठी भोर(आयटीआय), वेल्हे (पंचायत समिती), पानशेत (कुरण खुर्द) आणि मुळशी (कासार अंबोली) या चार ठिकाणांवरून साहित्याचे वितरण केले. साहित्य आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पाठविण्यासाठी १९० वाहनांची सोय केली. यामध्ये ९० एसटी बस, ७१ खासगी जीप आणि नऊ खासगी मिनीबस आदींचा समावेश आहे, अशी माहिती मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
२०३ भोर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २४० मतदान केंद्र हे भोरमध्ये असून मुळशीत २२८ तर वेल्हेमध्ये ९६ मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेसाठी पोलिसांसहीत तीन हजार ३८४ कर्मचारी मतदान केंद्रांवर पाठविले आहे. ३३८ कर्मचारी राखीव ठेवले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी ७० झोनल ऑफिर्सची नियुक्ती केली आहे. भोर शहरातील ४९३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर सर्वाधिक एक हजार ४७२ मतदार असून त्याखालोखाल मुळशी तालुक्यातील मान येथील ६१ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदारांची संख्या एक हजार ४६२ आहे. तर भोर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बुरुडमाळ येथील ४०० क्रमांक असलेल्या मतदान केंद्रावर सर्वात कमी ४२ मतदार संख्या आहे. भोरमधून रायरेश्वर किल्ल्यावरील मतदान केंद्रावरील कर्मचारी व साहित्य सर्वप्रथम पाठविण्यात आले.
भोर मतदारसंघातील मतदार संख्या
तालुका पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी एकूण मतदार
भोर ८५,९४१ ८४,२७१ १ १७०२१३
वेल्हे २८,३१३ २५,७३५ २ ५४०५०
मुळशी १,१३,०८६ ९२,९२४ ५ २,०६,०१५
एकूण २,२७,३४० २,०२,९३० ८ ४,३०,२७८
भोर मतदारसंघाची माहिती
तपशील भोर वेल्हे मुळशी एकूण
मतदान केंद्र २४० ९६ २२८ ५६४
झोनल ऑफिसर्स २९ १४ २७ ७०
वाहने एस टी ३५ १५ ४० ९०
खासगी जीप ३३ २२ १८ ७१
मिनी बस ९ ० ० ९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

