उत्रौलीत डंपरच्या धडकेत विजेच्या तारा पडून आग

उत्रौलीत डंपरच्या धडकेत
विजेच्या तारा पडून आग
Published on

भोर, ता. १८ : उत्रौली (ता. भोर) येथे रेडीमिक्सर डंपरची महावितरणच्या वीज खांबाला धडक बसल्याने वीजवाहक तारा पडून लागलेल्या आगीत जनावरांचा चारा साठविलेल्या दोन गंजी जळाल्या. सुदैवाने घरांवर पडलेल्या वीजवाहक तारांमधून कोणालाही इजा झाली नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मंगळवारी (ता. १८) दुपारी दीडच्या सुमारास सिमेंट रेडीमिक्सरच्या डंपरची उत्रौली गावातील प्राथमिक शाळेच्या समोरील विजेच्या खांबाला धडक बसली. त्यामध्ये विजेचा खांब आडवा झाला आणि वीजवाहक तारा तुटल्या. वीजवाहक तारा तुटून शेजारच्या चार-पाच घरांवर पडल्या. सुदैवाने घरांमधील कोणालाही इजा झाली नाही. मात्र, तारा ओढल्या गेल्यामुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासमोरील विजेच्या तारा कोसळल्यामुळे आग लागली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्यासाठी रचलेल्या गवताच्या दोन गंजी जळाल्या. स्थानिक नागरिकांनी आणि भोरमधील अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. संबंधित अपघातग्रस्त डंपरच्या मालकाने वीजेचे नवीन खांब बसवून दिले आणि संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. त्यामुळे पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नवीन खांब बसविला आणि विजेच्या तारा ओढून सायंकाळपर्यंत उत्रौलीमधील वीजपुरवठा सुरळीत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com