भोर- मांढरदेवी रस्त्याच्या कामाला वेग

भोर- मांढरदेवी रस्त्याच्या कामाला वेग
Published on

भोर, ता. १० ः कापूरहोळ- भोर- मांढरदेवी मार्गाच्या क्रॉंक्रीटीकरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीच्या सणापूर्वी हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी दिली.
एशियन बँक डेव्हलपमेंट मार्फत ३३० कोटी रुपये खर्चून कापूरहोळ- भोर- मांढरदेवी- वाई- सुरूर या ६४ किलोमीटर मार्गाच्या क्रॉंक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यापैकी ५४ किलोमीटरचे काम हे भोर हद्दीत, तर १० किलोमीटरचे काम हे वाई (जि. सातारा) तालुक्याच्या हद्दीत आहे. मार्च २०२३मध्ये सुरू झालेल्या या कामाची मुदत फेब्रुवारी २०२५ पर्यंत होती. मात्र भौगोलिक परिस्थिती आणि पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ठेकेदार एस. एम. अवताडे यांना आणखी सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
सद्यःस्थितीत कापूरहोळ ते मांढरदेवीपर्यंत ३५ किलोमीटरच्या क्रॉंक्रीटीकरणाचे काम आणि गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. भोर शहराजवळ २ किलोमीटरचे काम हे महावितरणच्या लाईन व पाण्याच्या योजनांमुळे अपूर्ण राहिले आहेत. तसेच अंबाडखींड (ता. भोर) घाटातील व वुंडेवाडी (वाई) घाटातील साडेपाच किलोमीटरचे काम हे वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे अपूर्ण आहे. एशियन डेव्हलपमेंटच्या वतीने आळंदे येथे महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. याशिवाय आवाज व सुरक्षिततेच्या दृष्टीने आळंदे येथे शाळेच्या बाजूला रस्त्याच्या कडेला आणि भोर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला मोठी संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. काम पूर्ण झालेल्या मार्गावर दिशादर्शक व चिन्हांकित बोर्ड, रस्त्यांवरील पट्टे आणि संरक्षक कठडे उभारण्याचे काम बाकी आहे. यावर्षी दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण होऊन मार्गावरून सुरक्षीत आणि योग्य प्रकारे वाहतूक होईल, असा विश्वास मेटेकर यांनी व्यक्त केला.

अपूर्ण काम असलेली ठिकाणे
भोर शहराजवळ २ किमी.
गोकवडी गावाजवळील २०० मीटर.
अंबाडखींड घाट व गुंडेवाडी घाट ५.५ किमी.
संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक आणि पट्टे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com