अंबाडे येथील शेतीचा पाणीप्रश्‍न मिटणार

अंबाडे येथील शेतीचा पाणीप्रश्‍न मिटणार
Published on

भोर, ता. १३ : अंबाडे (ता.भोर) येथील जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामास शुक्रवारी (ता.११) सकाळी प्रारंभ करण्यात आला. यामुळे बंधाऱ्यामधील उन्हाळ्यात कमी होत असलेला पाण्याचा साठा वाढणार आहे. जनावरांच्या पाण्याचा आणि जवळपासच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने करण्यात येणाऱ्या या कामाची सुरुवात भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन आणि पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, अंबाडेच्या सरपंच माधुरी खोपडे, उपसरपंच गीता उल्हाळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सपकाळ, मनोज खोपडे, शिवाजी खोपडे, ज्ञानेश्वर खोपडे, रोहण खोपडे, प्रसन्न उल्हाळकर, संतोष खोपडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी पर्यवेक्षक अनिल पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे अंबाडेच्या ग्रामपंचायतीने ठराव करून सुमारे १५ वर्षांपूर्वीच्या जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा निर्धार केला. गावातील सर्व ग्रामस्थांनी यास प्रतिसाद देत बेलाचा ओढा नावाच्या ओढ्यावरील जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरविले.
दरम्यान, बंधाऱ्यातून स्मशानभूमीलाही पाणीपुरवठा केला जाणार आहे. ओढ्याचे खोलीकरण केल्यानंतर मिळणाऱ्या पाण्यामुळे स्मशानभूमीलगत झाडे लावण्यात येणार असल्याचे सरपंच माधुरी खोपडे यांनी सांगितले.
‘सकाळ’ कडून बातम्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याबरोबर ‘सकाळ रिलीफ फंड’ आणि ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून करीत असलेले सामाजिक उपक्रम हे खरच कौतुकास पात्र आहेत, असे सांगत नजन यांनी कृषी क्षेत्रासाठी ‘‍सकाळ’ने केलेल्या योगदानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. असा विश्वास व्यक्त केला.

05178

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com