कापूरहोळला पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा

कापूरहोळला पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा
Published on

भोर, ता. २५: कापूरहोळ (ता.भोर) येथे रविवारी (ता. २५) दिवसभर वाहतूक कोंडी झाली. दुपारनंतर पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस असून शनिवारी व रविवारी फिरायला गेलेले पर्यटक हे परतीच्या मार्गावर होते. त्यामुळे शनिवारपासूनच पुणे-सातारा महामार्गावर वाहनांची गर्दी होती.
पुणे-सातारा महामार्गावर कापूरहोळ जवळील हरिश्चंद्री येथील भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. महाबळेश्वर, वाई, सातारा, भोर, वरंधा घाट व इतर ठिकाणी रविवारी फिरावयास गेलेले पर्यटक परतीच्या मार्गावर होते. याशिवाय केतकावळे येथील बालाजी मंदिर, नारायणपूर, भोर आणि इतर ठिकाणावर जाण्या-येण्याचा मार्ग हा कापूरहोळ चौकातूनच जातो. त्यामुळे गर्दीतच अधिकच भर पडली.
सातारा बाजूकडून पुण्याला जाणाऱ्या काही वाहनचालकांनी आपली वाहने सेवा रस्त्यावर घातली तर काही वाहनचालकांनी विरुद्ध बाजूच्या सेवा रस्त्यावर वाहने उलट दिशेने घातली. त्यामुळे कापूरहोळ चौकातील सेवारस्त्यांसह भुयारी मार्गही बंद झाले. पुण्याहून भोरला जाणारी वाहनेही कापूरहोळ चौकात अडकून पडली. सातारा बाजू कडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या वाहनांच्या रंग किकवी गावापर्यंत लागल्या. काही वाहनचालकांनी भोरला जाण्यासाठी शिंदेवाडी मार्गाचा अवलंब केला. रविवारी दुपारनंतर पुण्याहून भोरला येण्यासाठी वाहनांना २ ते ३ तास लागले. राष्ट्रीय महामार्गाचे पोलिस आणि राजगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र,कोंडीत भरच पडत गेली.

05346

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com