भोरमधील नैसर्गिक आपत्तीसाठी अधिकाऱ्यांनी सज्ज रहा : खरात

भोरमधील नैसर्गिक आपत्तीसाठी अधिकाऱ्यांनी सज्ज रहा : खरात

Published on

भोर, ता.२५ : ‘‘भोर तालुक्यातील शासनाच्या विभागातील अधिकाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीसाठी सज्ज राहावे’’, अशी सूचना उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात यांनी केली.
भोरमधील प्रांताधिकारी कार्यालयात सोमवारी (ता २३ ) दुपारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी किरण कुमार धनवाडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत साबणे, उपविभागीय वन अधिकारी शीतल राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी शिवम शेंडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजसाहेब आगळे, राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता ए. डी. सुर्वे, जलसंपदा विभागाचे गणेश डेंगळे आदींसह तालुक्यातील शासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार
तालुक्यातील कापूरहोळ-भोर -मांढरदेवी -वाई या मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे आणि शिंदेवाडी (ता.सातारा) -भोर -वरंधा घाट या मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेच्या योग्य त्या उपाययोजना कराव्याtत. याशिवाय तालुक्यात अनधिकृतपणे उभारलेले धोकादायक होर्डिंग तातडीने काढण्यात यावेत. या उपाययोजना न केल्यास दुर्घटना झाल्यावर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com