भोर मतदारसंघातील महावितरणच्या 
कामांसाठी ४ कोटी ७१ लाखांचा निधी

भोर मतदारसंघातील महावितरणच्या कामांसाठी ४ कोटी ७१ लाखांचा निधी

Published on

भोर, ता. ३ ः जिल्हा नियोजन समितीकडून भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील वीज महावितरणच्या २७ कामांसाठी ४ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामधून महावितरणची नविन रोहित्र बसविणे, विजेचे खांब बसविणे आणि अंतर्गत वीजवाहक तारा बसविणे आदी कामे करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाला असल्याचेही रणजित शिवतरे यांनी सांगितले.
निधीतून होणाऱ्या विकासकामांची ठिकाणे, कंसात रक्कम लाखांमध्ये ः
भोर तालुका-भोंगवली येथील सबनिसबाग येथे १०० के व्ही ए विद्युत रोहित्र बसविणे (१४ लाख), माझगाव येथे १०० के व्ही ए विद्युत रोहित्र बसविणे (१५ लाख), तांबाड येथे २०० के व्ही ए विद्युत रोहित्र बसविणे (१७ लाख), तळे म्हसवली येथे १०० के व्ही ए विद्युत रोहित्र बसविणे (१० लाख), उत्रौली येथे १०० के व्ही ए डीटीसी, ३एचटी आणि विजेचे खांब बसविणे (१५ लाख), उत्रौली सटवाई मंदिर १०० के व्ही ए विद्युत रोहित्र बसविणे (१५ लाख), भोलावडे गावठाण येथे १०० के व्ही ए विद्युत रोहित्र व पोल बसविणे (१५ लाख), नसरापूर येथील चेलाडी फाटा ते बनेश्वर रस्ता दरम्यान अंडर ग्राउंड केबल टाकणे (१ कोटी १९ लाख) आणि २४) लोहकरेवाडी गावठाण येथे १०० के. व्ही. ए विद्युत रोहित्र बसविणे (१२ लाख)

मुळशी तालुका - चांदे अडसूळवस्ती येथे २०० के व्ही ए विद्युत रोहित्र व ५ पोल बसविणे (२१ लाख), माण येथील पारखी चांदे फाटा येथे २०० के व्ही ए विद्युत रोहित्र (२६ लाख), नांदे शिंदे वस्ती येथे २०० के व्ही ए विद्युत रोहित्र (१४ लाख), लवळे येथील पाणी पुरवठा योजना २०० के व्ही ए विद्युत रोहित्र (१३ लाख), पोमगाव कात्रटवस्ती येथे २०० के व्ही ए विद्युत रोहित्र (१५ लाख), आंबेगाव येथे २०० के व्ही ए विद्युत रोहित्र (१२ लाख), रिहे बोरकरवाडी येथे १०० के व्ही ए विद्युत रोहित्र व ३ पोल (१३ लाख), वेडे पाणी पुरवठा योजना १०० के व्ही ए विद्युत रोहित्र (१३ लाख), घोटावडे गोडांबेवाडी क्र १ येथे २०० के व्ही ए विद्युत रोहित्र (१६ लाख), पिरंगुट सोनई रोड मागची वस्ती येथे २०० के व्ही ए विद्युत रोहित्र (१० लाख), माले खैरे वस्ती परिसरात १०० के व्ही ए विद्युत रोहित्र (१३ लाख), हाडर्शी आखाडे वस्ती येथे १०० के व्ही ए विद्युत रोहित्र (१४ लाख), निवे गावठाण येथे १०० के व्ही ए विद्युत रोहित्र (६ लाख), आदरवाडी येथे १०० के व्ही ए विद्युत रोहित्र (८ लाख).
राजगड तालुका - पाबे गावठाण लिंबारवाडी येथे २०० के व्ही ए विद्युत रोहित्र (२३ लाख), मांगदरी - केतकावणे वाडी येथे पाणी पुरवठा योजना १०० के व्ही ए विद्युत रोहित्र (९ लाख), वरसगाव येथे भैरवनाथ मंदिर जवळ ६३ के व्ही ए विद्युत रोहित्र (९ लाख), कोळवडी देशपांडे माळ येथे १०० के व्ही ए विद्युत रोहित्र (१२ लाख).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com