भोरमधील ६५ ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्रे
भोर, ता. ३ : येथील जिद्द फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा कविता खोपडे यांच्या पुढाकाराने तालुक्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या गावांमधील ६५ ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवण यंत्रे देण्यात आली. पुण्यातील काशीबाई नवले हॉस्पिटल, लक्ष फाउंडेशन आणि मुंबईतील आल्मिको कंपनी यांच्या सहकार्याने जिद्द फाउंडेशनने हा उपक्रम राबविला. तालुक्यातील ६० वर्षांपुढील नागरिकांना पुण्यातील शिबिरात नेऊन त्यांच्या कानाची मोफत तपासणी करण्यात आली. आवश्यक त्या ६५ ज्येष्ठ नागरिकांना श्रवण यंत्रांचे वाटप केले. श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज अँड जनरल हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. एस पी. भोरे, संचालक डॉ. मधुकर जगताप आणि तसेच कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. एस. एस. नेमाडे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कानांच्या तपासण्या केल्या. या वेळी जिद्द फाउंडेशनच्या अध्यक्षा कविता खोपडे, रोशन मराठे, आल्मिको कंपनीचे राम रामसिंग व दीपक सचेन उपस्थित होते.
समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार असल्याचा निर्धार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आर्थिक व भौगोलिक मर्यादांमुळे अनेक नागरिक श्रवणयंत्रांसारख्या मूलभूत वैद्यकीय साधनांपासून वंचित राहतात. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आम्ही उपक्रमाचे आयोजन केले. भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात घेणार आहोत.
- कविता खोपडे, अध्यक्षा, जिद्द फाउंडेशन भोर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.