ऐतिहासिक प्रतिमांनी उजळले भोरचे बसस्थानक
भोर, ता. ८ : येथील (ता. भोर) एसटी बस स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतल्याच्या मोठ्या प्रतिमेासह महाराजांचे सरदार आणि शिवराज्याभिषेकाचे छायाचित्र बसविले आहे. बसस्थानक ऐतिहासिक छायाचित्रांनी उजळल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
भोरमधील मंगळवारी (ता.८) सकाळी व्यवस्थापक रमेश मंता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या वंशजांच्या हस्ते या प्रतिमांचे अनावर करण्यात आले. भोर आगाराचे वाहतूक व्यवस्थापक प्रदीपकुमार इंगवले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. आयआयएफएल फायनान्स कंपनी हे या उपक्रमाचे प्रायोजक आहेत. एसटी स्थानकातील भिंतींवर स्वराज्य शपथेच्या मोठ्या फोटो प्रतिमेसह सरदार बाजीप्रभू देशपांडे, कान्होजी जेधे, बाबाजी धुमाळ, कोयाजी बांदल, सिदोजी थोपटे, संभाजी-कावजी कोंढाळकर, जिवा महाले व येसाजी कंक यांच्या प्रतिमा असलेले फोटो लावण्यात आले आहेत. याशिवाय कृष्णाजी बांदल, बाजी (सर्जेराव) जेधे, नागोजी जेधे, फुलाजीप्रभू देशपांडे, भैरोजी चोर, तुकोजी चोर, कृष्णाजी कंक, वाघोजी तुपे, तानाजी पेटकर, बाजी बांदल व रायाजी बांदल यांची नावे असलेली छायाचित्रे लावली आहेत. अशा ऐतिहासिक छायाचित्रांमुळे भोरच्या एसटी बसस्थानकाचे सौंदर्य उजळले असून प्रवाशांसह महाविद्यालयीन तरुण-तरुणींदेखील आनंद व्यक्त केला.
दरम्यान, अनावरणाच्या कार्यक्रमास सरदारांचे वंशज रणधीर जेधे, राजेंद्र तावरे, संदेश देशपांडे, रघुनाथ कोंढाळकर, भरत साळुंके, ध्रूव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर, एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन जेधे, सत्यवान काटकर, मनोज पाटणे, आयआयएफएल फायनान्स कंपनीचे भोर शाखेचे व्यवस्थापक जावेद मुलाणी व सुनील गायकवाड आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
ऐतिहासिक प्रतिमांच्या उपक्रमामुळे बसस्थानकात एसटीची वाट पाहत बसणाऱ्या प्रवाशांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अधिक आदर निर्माण होईल, असे मत राजीव केळकर यांनी व्यक्त केले.
मोहन जेधे यांनी सूत्रसंचालन केले.
05438
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.