कांबरे बुद्रुकमधील वीजपुरवठा सुरळीत

कांबरे बुद्रुकमधील वीजपुरवठा सुरळीत

Published on

भोर, ता. १० : कांबरे ब्रुद्रुक (ता.भोर) येथील ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना केलेल्या सहकार्यामुळे बंद पडलेले रोहित्र चार दिवसानंतर बदलण्यात यश आले.
रोहित्र आणण्यासाठी व बसविण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांमुळे पाचव्या दिवशी कांबरे ब्रुद्रुक गावचा वीजपुरवठा सुरळीत झाला. ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल महावितरणचे भोरचे उपअभियंता अविनाथ वाघमारे यांनी ग्रामस्थांना धन्यवाद दिले. वादळी पावसामुळे शुक्रवारी (ता.४) दुपारी कांबरे ब्रुद्रुक येथील रोहित्र जळाले. त्यामुळे दीडशे पेक्षा जास्त घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे उपअभियंता अविनाश वाघमारे यांनी दुसऱ्या रोहित्राची व्यवस्था केली. महावितरणच्या शाखा अभियंता दीपाली खवणे यांनी वायरमन दत्ता गायकवाड यांच्यासह जेसीबी आणि सहा कर्मचाऱ्यांसमवेत सोमवारी (ता.७) रोहित्र बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु मुसळधार पावसामुळे ते बदलण्यासाठी आणलेला जेसेबी चिखलात रुतून बसला. त्यामुळे रोहित्र बदलणे शक्य झाले नाही. मंगळवारी (ता. ८) सकाळी सरपंच मनीषा ओंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी नवीन रोहित्र बदलण्यासाठी सहकार्य केले. यासाठी दत्तात्रेय सुकाळे, जगन्नाथ जंगम, ऋषी चिकणे, गोकूळ चिकणे, तुषार सुकाळे, अनंत जंगम, प्रकाश ओंबळे, एकनाथ सुकाळे, विष्णू चौधरी व दिलीप सुकाळे आदींनी विशेष प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com