भोरमध्ये ५० वर्षांपूर्वीच्या दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना
भोर, ता. ८ : शहरातील महाड नाका परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह आवारात सुमारे ५० वर्षांपूर्वीच्या जुन्या असलेल्या दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद गुजर यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून या दत्तमंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आली. गुरुवारी (ता. ४) सकाळी झालेल्या कार्यक्रमात प्रवीण पानसरे यांनी धार्मिक पौराहित्य करून अकल्पिता देशपांडे व श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली. याठिकाणची जुनी दगडामधील दत्तमूर्ती ही ५० वर्षांपूर्वीची असल्याने ती जीर्ण झाली होती. म्हणून गुजर यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा विचार मांडला. त्यास सहकाऱ्यांनी सहमती दिली आणि लोकवर्गणी काढण्यात आली. नवीन दत्तमूर्ती ही अडीच फूट उंचीची संगमरवरी दगडामध्ये असून, मूर्तीसाठी संगमरवरी दगडाचे मंदिरही बनविले आहे. यावेळी प्रमोद गुजर, सुबोध रावळ, चेतन गुजर, सचिन भोंडवे, समीर झगडे, दत्तात्रेय शिवतरे आदी उपस्थित होते.
05767