मतदार यादीवरील हरकती सादर कराव्यात
भोर, ता. ९ : नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी बुधवारी (ता. ८) प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावरील हरकती घेण्यास सुरुवात झाली आहे. मतदार यादीबाबत नागरिकांच्या हरकती असल्यास त्या निर्धारित वेळेत दाखल कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी केले.
याद्यांबाबत हरकती व सूचना दाखल करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोंबर आहे. ज्या नागरिकांना हरकती नोंदवायच्या असतील त्यांनी कार्यालयीन वेळेत नगरपालिकेच्या कार्यालयात नोंदवाव्यात, असेही मुख्याधिकारी शिंदे यांनी सांगितले. मतदार यादी पाहण्यासाठी https://mahaulb.in/MahaULB/home/ulblist/viewmore या नगरपालिकेच्या संकेतस्थळाचा वापर करावा, असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरात एकूण १६ हजार ७१६ मतदार असून त्यामध्ये आठ हजार १८१ पुरुष मतदार तर आठ हजार ५३५ महिला मतदार आहेत.
प्रारूप यादीनुसार प्रभागनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे -
प्रभाग पुरुष महिला एकूण मतदार
१ ७५७ ७८९ १५४६
२ ७२६ ७५४ १४८०
३ ७१५ ७७७ १४९२
४ १०१९ १०१६ २०३५
५ ८१४ ८७५ १६८९
६ ८२९ ८६८ १६९७
७ ९३६ ९३९ १८७५
८ ९२७ ९५४ १८८१
९ ५९० ६२६ १२१६
१० ८६८ ९३७ १८०५
एकूण ८१८१ ८५३५ १६७१६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.