ध्रुव प्रतिष्ठानमुळे ५३० कुटुंबांची दिवाळी गोड
भोर, ता. २१ : टिटेघर (ता. भोर) येथील ध्रुव प्रतिष्ठानच्यावतीने भोर तालुक्यातील ५३० आदिवासी आणि कातकरी कुटुंबांना दिवाळी फराळ आणि किराणा साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये दिवाळीसाठी मोती साबण, उटणे, सुवासिक तेल, गूळ, दगडी पोहे, चिवडा मसाला, तेल पिशवी, तूप, रवा, खोबरे, शेंगदाणे, भाजकी डाळ आदींसह विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाश कंदील आदींचा समावेश आहे. प्रत्येक कुटुंबास ९०० रुपये किमतीचे साहित्य देण्यात आले. ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी सहकाऱ्यांसमवेत जाऊन नऊ गावांच्या हद्दीत असलेल्या झोपडपट्टीमधील कातकरी, गोसावी, बेलदार नंदिवाले या समाजातील कुटुंबांना साहित्याचे वाटप केले. तालुक्यातील टिटेघर, म्हाकोशी, आंबवडे, नाझरे, झूलतापूल, करंजे, नाटंबी आणि नेरे या गावातील आदिवासी व कातकरी कुटुंबांना याचा लाभ मिळाला. गेल्या १७ वर्षांपासून ध्रुव प्रतिष्ठानकडून गरजू आदिवासी कुटुंबासाठी दिवाळी साहित्य वाटपासह शिक्षण, महिला सबलीकरण व आरोग्य यासाठी काम करीत आहे. साहित्य वाटपासाठी विजय मुकणे, गोविंदा वाघे, शांताराम पवार, दीपक पवार, सुनंदा पवार, योगीराज केळकर व राहुल खोपडे यांनी सहकार्य केले. राजीव केळकर यांनी ध्रुव प्रतिष्ठानमार्फत आदिवासी कुटुंबांना दिलेल्या दिवाळीच्या साहित्याबद्दल प्रांताधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.