महुडे खोऱ्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप
भोर : येथील महाडनाका परिसरातील श्री स्वामी समर्थ व्हॉटस्ॲप ग्रुपच्या वतीने संविधान दिनानिमित्त बुधवारी ( ता १६) शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यामध्ये संविधानाच्या आणि गोष्टींच्या पुस्तकांचा समावेश आहे. श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी संतोष कदम यांनी महुडे खोऱ्यातील गवडी, नानाची वाडी व सणसवाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले. आणि त्यांना संविधान दिन व मुंबईतील हल्ल्याबाबत माहिती दिली. १६ वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर या दिवशी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष वडेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवडीचे मुख्याध्यापक पुंडलिक पाटील, शिक्षिका नीलम बनकर, नानाची वाडीचे मुख्याध्यापक किरण कांबळे, सणसवाडीचे शिक्षक अशोक चव्हाण उपस्थित होते.
6129
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

