भोरमधील तरुणाची
घरात आत्महत्या

भोरमधील तरुणाची घरात आत्महत्या

Published on

भोर, ता. २६ : शहरातील वाघजाईनगर परिसरात राहणाऱ्या मयूर संपत खुंटे (वय १८) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (ता. २६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
याबाबत भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर याने एका अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. त्याची तक्रार आल्यानंतर मंगळवारी (ता. २५) रात्री त्यास भोर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. मयूर हा वडिलांसमवेत पोलिस ठाण्यात गेला होता. त्यावेळी संबंधित मुलगी आणि तिचे वडीलही हजर होते. पोलिसांनी मयूर यास समज देवून घरी पाठवले. त्यानंतर बुधवारी सायंकाळी मयूर याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान पोलिसांनी मारल्यामुळे मयूर याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com