आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे जोरदार स्वागत होणार
भोर, ता. १ : आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यासाठी तालुका प्रशासनाने पावले उचलली आहेत. स्पर्धकांचे स्वागत करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. येथील तहसील कार्यालयात बुधवारी (ता. ३१) सकाळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीस भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन, राजगडचे तहसीलदार निवास ढोणे, भोरचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, राजगडचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ, गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे, विस्तार अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
तालुक्याच्या गुंजवणी धरण खोऱ्यातील गावांमधून प्रथमच आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे स्पर्धक धावणार आहेत. दिवळे (ता.भोर) येथून स्पर्धकांचे आगमन तालुक्यात आगमन होणार असून कापुरव्होळ, कासुर्डी गुमा, तेलवडी, मोहरी ब्रुदुक, मोहरी खुर्द, हातवे ब्रुदुक, दिडघर, वीरवाडी, जांभळी, कुरुंगवडी, आंबवणे, करंजावणे, मांगदरी, वांगणी, निगडे, बोरावळे, कुसगाव व शिवापूर या मार्गावरून स्पर्धक जाणार आहेत. या मार्गाच्या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गावातील राजकीय पदाधिकारी यांची ५० जणांची यादी तयार करून त्यामध्ये १० जणांमध्ये एक मॉनिटरची नेमणूक केली जाणार आहे. त्यांना टी शर्ट, टोपी व जिल्हाधिकारी यांच्या सहीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या वेळेत गावातील नागरिक, जनावरे व पाळीव प्राणी रस्त्यावर येऊन अनुसूचित प्रकार घडू नये. यांची जबाबदारी संबंधित मॉनिटरवर राहणार आहे. प्रत्येक गावात स्वागत कमान उभारून शाळा महाविद्यालयांमधील एन सी सी ग्रुपचे विद्यार्थी स्वागतासाठी तयार ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय १० ते १७ जानेवारी दरम्यान प्रत्येक गावात स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती केली जाणार आहे. यामुळे आपल्या गावाचे नाव हे ४० देशांतील स्पर्धकांच्या यादी समावेश होणार आहे. यासाठी गावातील महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी ५ जानेवारी पासून जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पाच-पाच गावांची एकत्रित बैठक घेणार असल्याचे डॉ. खरात यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

