भोरला राजकीय पक्षांचे ४० उमेदवार

भोरला राजकीय पक्षांचे ४० उमेदवार

Published on

भोर, ता. २१ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या ३६ उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी १३, तर पंचायत समितीसाठी २२७ उमेदवारांचा समावेश आहे. बुधवारी (ता. २१) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजण्यापूर्वी पक्षांच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी एबी फॉर्म दिले.
इच्छूक उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे तालुक्यातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देणे अवघड झाले. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म न मिळाल्यामुळे काही इच्छुकांनी इतर पक्षात प्रवेश करून तिकीट मिळवले. काहींनी पक्षश्रेष्ठींकडून दबाव आणून तिकीट मिळविले, तर काहींना उमेदवारीपासून दूर रहावे लागले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे दुपारी तीन वाजेपर्यंत अधिकृत उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह होते. राजकीय पक्षांच्या संबंधीत पदाधिकाऱ्याने शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिल्यामुळे काही इच्छूकांचा भ्रमनिरास झाला. एबी फॉर्म देण्याबाबत अतीशय गुप्तता पाळण्यात आली.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीत लढणार असल्याने वेळू- नसरापूर गटाची एकमेव जागा राष्ट्रवादी कॉग्रस शरदचंद्र पवार पक्षाला देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेसाठी ३ आणि पंचायत समितीसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी ४ आणि पंचायत समितीसाठी ८ उमेदवार आहेत. शिवसेनेकडून जिल्हा परिषदेसाठी ३ आणि पंचायत समितीसाठी ५ उमेदवार आहेत. कॉंग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी १ व पंचायत समितीसाठी ३ उमेदवार आहेत. तर उबाठा कडून जिल्हा परिषदेसाठी १ आणि पंचायत समितीसाठी ३ उमेदवार आहेत.

पक्षनिहाय उमेदवार संख्या
भाजप- १२
राष्ट्रवादी- १९
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- १
शिवसेना- ८
कॉग्रेस- ४
उबाठा- ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com