भोर शहरातील बाजारपेठ, प्रचार बंद
भोर, ता. २८ ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी समजताच भोर शहरात सर्वत्र शांतता पसरली. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मंगळवार पेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी बाजारपेठ दिवसभर बंद ठेवून पवार यांना श्रद्धांजली वाहिली. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार थांबविला. राजकीय पक्षांच्या वतीने सुरू असलेले प्रचाराचे दौरे आहे त्या ठिकाणी बंद केले. दौरा बंद करण्यापूर्वी पक्षाच्या वतीने पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काही पक्षांनी पुढील दोन दिवसांचे नियोजित दौरेही रद्द केले. भाजपच्या वतीने माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यालयात श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्षा अॅड. जयश्री शिंदे, राजकुमार शिंदे, नगरसेविका रेणुका बदक, तृप्ती सुपेकर, मयूरी गायकवाड, मनिषा पवार, स्नेहल घोडेकर, पल्लवी सागळे, मनिषा भेलके, स्नेहा पवार, नगरसवेक गणेश पवार, जगदीश किरवे, अमित सागळे, जयवंत शेटे, कुणाल पलंगे, गणेश मोहिते, सचिन तारू, सुमंत शेटे, तौफीक आतार, रवींद्र बदक उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने माजी नगरसवेक यशवंत डाळ, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, नगरसेवक अनिल भेलके, कुणाल धुमाळ, केदार देशपांडे, सुरेखा मळेकर आदींनी श्रद्धांजली वाहिली. व्यापारी असोसिएशनच्या वतीने बंडूशेठ गुजराथी यांच्यासह व्यापाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

