भोरमध्ये श्रद्धांजलीसाठी सर्व पक्षीयांची हजेरी

भोरमध्ये श्रद्धांजलीसाठी सर्व पक्षीयांची हजेरी

Published on

भोर, ता. २९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भोरवासीयांच्या वतीने गुरुवारी (ता.२९) शोकसभेचे आयोजन करण्यात आले. नगरपालिकेसमोर सकाळी १० वाजता आयोजित शोकसभेत शहर आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.
नगरपालिकेच्या चौकातील जुन्या इमारतीसमोर अजित पवार यांचा मोठा फलक लावला होता. श्रद्धांजली वाहताना फोटोतील अजित पवार यांचा हसरा चेहरा पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष आदी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह अजित पवारांवर प्रेम करणारे असंख्य नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, यशवंत डाळ, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, उपनगराध्यक्षा अॅड. जयश्री शिंदे, राजकुमार शिंदे, रेणुका बदक, सुरेखा मळेकर, तृप्ती सुपेकर, मयूरी गायकवाड, मनीषा पवार, स्नेहल घोडेकर, मनीषा भेलके, स्नेहा पवार, गणेश पवार, जगदीश किरवे, अमित सागळे, जयवंत शेटे, कुणाल पलंगे, विकास खुटवड आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

दिलेला शब्द खरा करणारे नेते
राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकऱ्यांचा अश्रूचा बांध फुटला. दादा आमच्यासाठी वडिलांप्रमाणे होते असल्याचे सांगत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार हे वेळेचे बंधन पाळणारे, दिलेला शब्द खरा करणारे, स्पष्टवक्तेपणा असलेले राजकारणी नेते होते, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

06381

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com