राजा रघुनाथराव विद्यालयास जलशुद्धीकरण संयंत्र प्रदान
भोर, ता. ३ : येथील भोर हेल्थ अँड सोशल फाउंडेशन आणि शुभांगद गोरेगावकर स्मृती रुग्णालयाच्या वतीने राजा रघुनाथराव विद्यालयातील चार हजार विद्यार्थ्यांसाठी जलशुद्धीकरण संयंत्र (आरओ प्लॅट) प्रदान करण्यात आला.
कझाकिस्तान येथील भारतीय राजनैतिक अधिकारी (राजदूत) डॉ. देवेंद्र साळी यांच्या हस्ते विशेष कार्यक्रमात विद्यालयास जलशुद्धीकरण संयंत्र प्रदान करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची गरज असल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गुजर यांनी डॉ. सुरेश गोरेगावकर यांच्याकडे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी मदतीचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत डॉ. गोरेगाकवर यांनी भोर हेल्थ अँड सोशल फाउंडेशनमार्फत सुमारे साडेतीन लाख रुपये खर्चून विद्यार्थ्यांसाठी जलशुद्धीकरण संयंत्र प्रकल्प सुरू केला. डॉ. गोरेगावकर यांनी माणसात देव शोधल्यामुळेच विद्यार्थ्यांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभा केला असल्याचे प्रतिपादन डॉ. देवेंद्र साळी यांनी केले.
यावेळी भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत राजेशराजे पंतसचिव, स्वातीराजे पंतसचिव, नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर, भोर हेल्थ अँड सोशल फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. आनंदा कंक, डॉ. अमर भोर, अनिल पारगावकर, अपर्णा लावंड, संस्थेचे संचालक सुरेश शाह, मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे, उपमुख्याध्यापक नीलिमा मोरे आदी उपस्थित होते.
विक्रम शिंदे यांनी सूत्रसंचालन, तर डॉ. आनंदा कंक यांनी आभार मानले.
06391
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

