निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोरमध्ये पोलिसांचे पथसंचलन
भोर, ता. ४ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर पोलिस ठाण्याच्या वतीने प्रमुख तीन गावांमध्ये पथसंचलन करण्यात आले. आणि पोलिस ठाण्याच्या मैदानावर पोलिसांना दंगल काबू करण्यासाठीचे प्रशिक्षणही देण्यात आले. भोरचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. ४) तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या आणि प्रमुख उत्रौली, भोलावडे व वेनवडी या तीन गावांमधून पोलिसांनी पथसंचलन केले. यामध्ये पुणे ग्रामीणचे दंगल काबू पथकातील १५ जवान, भोर पोलिस ठाण्यातील महिलांसह १८ जवान आणि २० गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. तीनही गावांमधील प्रमुख रस्त्यांवरून केलेल्या पथसंचलनात सर्वात पुढे पोलिसांची व्हॅन त्यानंतर पोलिस अधिकारी आणि जवान सहभागी झाले. पथसंचलनानंतर पोलिस ठाण्याच्या मैदानावर दंगल झाल्यावर ती काबू कशी करावी? याबाबत पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. लाठी-काठी, ढाल आणि हेल्मेट कशा प्रकारे वापरावे? याबाबतच्या प्रशिक्षणाचाही यामध्ये समावेश होता.
निवडणुकीच्या दृष्टीने तालुक्यातील मुख्य आणि संवेदनशील गावांमध्ये निवडणुकीच्या काळात शांतता राहावी. मतदारांसह नागरिकांकडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये. यासाठी उत्रौली, भोलावडे व वेनवडी गावात पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले.
- पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

