गॅस शवदाहिनीची वापराविना दुरवस्था
भोर, ता. २४ : येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत नगरपालिकेमार्फत ८० लाख ९९ हजार रुपये खर्चून उभारलेली अत्याधुनिक गॅस शवदाहिनी अद्यापही सुरू केलेली नाही. गेल्या चार वर्षांपासून गॅस शवदाहिनी वापराविना असल्यामुळे तिची दुरवस्था झाली आहे. तेथे घाण पसरली आहे.
येथे सन २०२२ साली नगरपालिकेच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ८० लाख ९९ हजार रुपये खर्चून गॅस शवदाहिनी बसविण्याचा ठराव केला. तत्कालीन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते ५ जून २०२२ रोजी भूमीपूजन झाल्यानंतर १५ दिवसात गॅस शवदाहिनी सुरू करण्यात येणार होती. या गॅस शवदाहिनीत एका तासात अंत्यविधी होणार होता आणि त्यासाठी एका गॅस सिलिंडरचा खर्च येणार होता. सन २०२३ साली अंत्यविधीचे प्रात्यक्षिकही घेतले. परंतु, गॅस शवदाहिनी प्रस्तावाच्या खर्चाच्या तांत्रिक मंजुरीचा प्रश्न आणि इतर काम अपूर्ण राहिलेले होते. त्यामुळे अद्यापही गॅस शवदाहिनी सुरू झालेली नाही. सद्यःस्थितीत गॅस शवदाहिणीचे फाटक बंद असून, आतमध्ये झुडपांचे आणि घाण पसरली आहे.
याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘‘गॅस शवदाहिनीचा विषय मी येण्यापूर्वीचा आहे. याची संपूर्ण माहिती घेऊन मी याबाबत विस्ताराने सांगेल.’’
06484
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

