वीसगाव खोऱ्यात १५ दिवसांत दुसरी घडफोडी

वीसगाव खोऱ्यात १५ दिवसांत दुसरी घडफोडी

Published on

भोर, ता. १ : तालुक्याच्या वीसगाव खोऱ्यातील भाबवडी येथील भरदिवसा घरफोडीची घटना ताजी असतानाच शुक्रवारी (ता. २७) दुपारी हातनोशी (ता.भोर) गावात बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये २ लाखांचे सोन्याचे दागिने आणि ५ हजारांच्या रोख रकमेचा समावेश आहे.
याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हातनोशी येथील रंजना ज्ञानोबा थोपटे (वय ६५) या शुक्रवारी सकाळी पतीसमवेत बाहेरगावी गेले होते. सायंकाळी यांच्या घरातील मुले शाळेतून घरी आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि २ लाख ५० हजारांचे सोन्याचे दागिने व ५ हजारांची रोकड चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच भोरचे प्रभारी पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील, उपनिरीक्षक दीप्ती करपे व पोलिस हवालदार यशवंत शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आठवडाभरात दुसरी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांढरदेव (ता.वाई जि.सातारा) येथील श्री काळूबाई(मांढरदेवी)ला भोर बाजूकडून जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. मांढरदेवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून विशेषतः पूर्वेकडील जिल्ह्यातून भाविक येतात. आजपर्यंत झालेल्या चोरीच्या घटना या मांढरदेवीच्या यात्रेच्या कालावधीतच झाल्या आहेत. यावर्षी भाबवडी येथे शुक्रवारी (ता.१३ फेब्रुवारी) दिवसा बंद असलेले घर फोडून रोख रक्कम चोरून नेली होती. आणि आता शुक्रवारी (ता. २७) हातनोशी येथेही अशाच पद्धतीने चोरी झाली. यामुळे मांढरदेवीच्या दर्शनाला आलेल्यांकडून भोर-मांढरदेवी मार्गावरील बालवडी आणि भोर-कापूरव्होळ मार्गावरील कासुर्डी येथे चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे मांढरदेवीच्या यात्रेला येणाऱ्या नागरिकांचे रेकॉर्ड असावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com