प्रलंबित जमीन मोजणी पूर्ण करण्यावर भर

प्रलंबित जमीन मोजणी पूर्ण करण्यावर भर
Published on

भोर, ता. ११ : ‘‘गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत. पुढील एप्रिल महिन्यापर्यंत प्रलंबित ५२ प्रकरणांची मोजणी पूर्ण करण्यात येणार आहेत,’’ अशी माहिती भोरच्या भूमी अभिलेख विभागाचे तालुका निरीक्षक हेमंत निगडे यांनी दिली.
गेल्या वर्षी पाऊस, निवडणुका आणि विमानतळ भूसंपादनाच्या कामामुळे तालुक्यातील मे महिन्यापासून ९१ प्रकरणांची मोजणी रद्द झाली. त्यापैकी ३९ प्रकरणांची मोजणी यावर्षी पूर्ण झाली आहे. अद्यापही ५२ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांची मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला. परंतु शासनाच्या ई-मोजणी आज्ञावाली (ई-मोजणी सॉफ्टवेअर) मधून शेतकऱ्यांना रद्द झालेल्या मोजणीची पुनर्मोजणीसाठी तारीख मिळालेली नाही. यासाठी भूमी अभिलेख विभागाने मार्च आणि एप्रिल महिन्यात विशेष अभियान राबवून मोजण्या पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
भोरच्या भूमी अभिलेख विभागात भूकरमापकांच्या मंजूर असलेल्या पाच अधिकाऱ्यांपैकी तीन पदे रिक्त असून एक प्रतिनियुक्तीवर आहे. त्यामुळे कार्यालयात फक्त एकच भूकरमापक कार्यरत आहे. तरीदेखील इतरांच्या मदतीने आणि सुट्टीच्या दिवशीही मोजणीची कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही निगडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे कार्यालयात वारंवार हेलपाटे
जमिनीच्या मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर मोजणीसाठी पुढील तीन-चार महिन्यांची तारीख मिळते. परंतु त्या वेळेत नैसर्गिक आपत्ती, शासकीय कामकाजामुळे किंवा इतर कारणांमुळे मोजणी रद्द होते. मोजणी रद्द झाल्यानंतर पुनर्मोजणी कधी होईल हे शेतकऱ्यांना आज्ञावलीमधून समजत नाही. त्यामुळे मोजणी कधी होईल हे जाणण्यासाठी शेतकऱ्यांना कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com