भोरमध्ये आता कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

भोरमध्ये आता कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
Published on

भोर, ता.२८: गुणवत्तापूर्ण आणि निकषानुसार काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार तर वेळेवर कामावर न येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचे शंकर मांडेकर यांनी सांगितले.
भोर येथे शुक्रवारी (ता.२७) सायंकाळी घेण्यात आलेल्या तालुक्यातील पाणीटंचाई व खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांनी वीज महावितरण कंपनी, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, कृषी विभाग व महसूल विभागांच्या असलेल्या तक्रारी मांडल्या. त्यावर आमदार शंकर मांडेकर यांनी संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्या पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या. शासनाच्या कृषी विभागाच्या व महसूल विभागाच्या योजना पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. वेळेची बचत करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी नागरिकांच्या असलेल्या तक्रारी एकत्रित करून संबंधित विभागांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असे सांगितले. तर कृषी विभागाने तालुक्यात तांदूळ महोत्सव सुरू करावा, अशी अपेक्षा जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड यांनी व्यक्त केली. दरम्यान, बैठकीस काही पदाधिकारी गैरहजर असल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com