

विजय जाधव : सकाळ वृत्तसेवा
भोर, ता. २९ : येथील ब्रिटिशकालीन भाटघर धरणातून भोर शहराला पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा योजनेची विहीर (जॅकवेल) भाटघर धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला असल्यामुळे भोर शहराला कधीच पाण्याची कमतरता जाणवत नाही. भाटघर धरणाची २४ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असल्याने भर उन्हाळ्यातही भोरकरांना टंचाईचा सामना करावा लागत नाही.
भोर शहराला उन्हाळ्यातही पाण्याची कमतरता जाणवत नाही. जलवाहिनीतून घराघरात येणाऱ्या नळाला तोट्या नसल्यामुळे पाणीगळती मोठ्या प्रमाणात होते. उन्हाळ्यात पाण्यात काही प्रमाणात गाळ येत असल्यामुळे मे महिन्यात कधी कधी दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.
शहराला होणारा पाणीपुरवठा
२५ हजार......भोर शहराची लोकसंख्या
४५ लाख लिटर.... दररोजचा पाणीपुरवठा
१५० लिटर......प्रतिव्यक्ती गरज भागविण्याइतके उपलब्ध पाणी
१० प्रभाग.......दररोज किमान अर्धा तास पाणीपुरवठा
भाटघर धरणातून शहराला पाणीपुरवठा दररोज सुरळीतपणे सुरू आहे. उन्हाळ्यात धरणातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर गढूळ पाणी येऊ नये किंवा सुरक्षिततेचे उपाय म्हणून मे महिन्यात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाते.
- गजानन शिंदे, मुख्याधिकारी, भोर नगरपालिका
पाणीपुरवठा योजना
शहराला पाणीपुरवठा करणारी योजना/योजना नाव - भोर शहर पाणीपुरवठा योजना
दररोजचा पाणीपुरवठा (एमएलडी) - ४.५ एमएलडी (४५ लाख लिटर)
किती भागांना/वॉर्डना पुरवठा - १०
पाणी येण्याची दररोजची वारंवारता - दररोज/एक दिवसाआड/तीन दिवसांनी
सध्याची पाणीस्थिती
आजचा साठा आणि एकूण क्षमता २४ टीएमसी......सध्या १२.५ टीएमसी
वापरण्यायोग्य पाणी -
मृत साठा - एक टक्का (७.०८ दशलक्ष घनमीटर)
दिवसाला किती पाणी उपसा - ४.५ एमएलडी
लोकसंख्या व गरज
शहराची लोकसंख्या.......२५०००
प्रतिव्यक्ती पाण्याची गरज.......१५०
तुटवडा / समस्या
सध्याची पाणीटंचाई (MLD मध्ये).......नाही
गळती/पाणी नुकसान......१० टक्के
अनियमित पुरवठा - नाही
टँकरवर अवलंबित्व - नाही.
पर्यायी व्यवस्था
टँकरची संख्या.......०
बोरवेल / विहिरींचा वापर.......०
पुढील अंदाज
पाणीसाठा किती दिवस पुरेल.......१२ महिने
पावसावर अवलंबित्व.......नाही
उन्हाळ्यातील धोका.......गढूळ पाणी येणे
अशा राबविल्या जातात उपाययोजना
गळती रोखणे मीटर बसवण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर
पाणी बचत अभियान सुरू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.